
नाशिक , (प्रतिनिधी ) दि. ६ जुलै २०२५ – नाशिक गुजराती ब्राह्मण समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) रविवार, दि. ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री. आर. पी. विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान समाजाचे अध्यक्ष श्री. हेमंतभाई तळाजिया यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात सहसचिव श्री. उर्वीश जोशी यांच्या मागील वर्षाच्या AGM च्या अहवाल वाचनाने झाली. त्यानंतर समाजाचे खजिनदार श्री. अक्षित मेहता यांनी सभेसमोर ऑडिट केलेले आर्थिक हिशोब सादर केले.
सभेमध्ये अध्यक्ष श्री. हेमंतभाई तळाजिया यांनी समाजासाठी स्वतंत्र हॉल उभारणीसाठी वरिष्ठ सदस्यांकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती सभासदांसमोर मांडली. तसेच, समाजामार्फत वर्षभरात अधिकाधिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. त्यांच्या या प्रस्तावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येत्या रक्षाबंधनानिमित्त समाजातर्फे सामूहिक यज्ञोपवीत बदलण्याचा विधी – श्रावणी कर्म – गायत्री यज्ञ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, आगामी नवरात्रोत्सवामध्ये सलग नऊ दिवस सामूहिक गरब्याचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
या सभेला गीताबेन, वर्षाबेन, श्रद्धाबेन, हितेशभाई, भरतभाई, जयकृष्णभाई, मलकेशभाई, जगदीशभाई, गौरांगभाई आदींसह समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेचे वातावरण सौहार्दपूर्ण व खेळीमेळीचे होते
