
नांदगाव ! नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील घाट माथ्यावरील बोलठाण येथील लक्ष्मीबाई गायकवाड यांनी नांदगाव भूमि अभिलेख कार्यालयाच्या विरोधात दिनांक 9 जुलै 2025 रोजची मंगळवार पासून उपोषण सुरू केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या बोलठाण येथील शेतकरी लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांची रोड लगत गट क्रमांक 310 ही 2 एकर 45 गुंठे शेतजमीन असून त्यांच्या बाजूला ३११ गट नंबर चा शेतकरी नेहमी वाद करत असून गट नंबर 310 ही माझीच शेती असल्याचे वारंवार सांगत कुरापत काढत आहे. नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयाकडे गट नंबर 310 साठी मोजणी दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी अर्ज सादर केला होता. परंतु त्या मोजणीनंतर प्राप्त झालेल्या अहवालामध्ये चुकीची माहिती नमूद करण्यात आली आहे का? अहवालात असे नमूद केले आहे की, गट नंबर 310 हा प्रत्यक्षात गट नंबर 311 च्या ठिकाणी आहे. आणि 311 हा 310 च्या ठिकाणी आहे. हा अहवाल प्रत्यक्ष नकाशा , रेकॉर्ड ऑफ राईट व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या शेतातील हक्काच्या विरोधात आहे. त्यामुळे गट नंबर 311 मधील शेतकरी वेळोवेळी लक्ष्मीबाई गायकवाड यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न करत असून एक काढण्याच्या वेळी मला त्रास देत असल्याचे उपोषणकर्त्या लक्ष्मीबाई गायकवाड यांनी बोलताना सांगितले. रेकॉर्ड ऑफ राईट आणि 7/12 उताऱ्यावर हे क्षेत्र हे माझ्याच बाजूने दाखवलेले असून मी कायदेशीर हक्काने ती शेती भोगत आहे. तरी नांदगाव भुमिअभिलेख कार्यालयाच्या भूमापन अधिकारी यांच्या 311 मधील शेतकऱ्याची प्रत्यक्ष हात मिळवणे झालेली असल्याने भूमापन अधिकारी यांनी तयार केलेल्या चुकीच्या मोजणी अहवालामुळे माझ्यावर अन्याय होत आहे. सदर मिळकत गट नंबर 310 हे क्षेत्र रोड नगर असल्याने गट नंबर 311 मधील दूध धारकाचे गट नंबर 310 शी काहीही संबंध असताना त्यांनी आपण अधिकारी यांच्याशी हार्दिक शुभेच्छा तयार करून याची दिशाभूल केली आहे.व सदर शेत जमीन मिळकत गट नंबर 310 मध्ये आपला मालकी हक्क निर्माण करण्याचा जबर दस्तीने प्रयत्न वारंवार नेहमी करत आहे. तसेच शेजारी गट नंबर 311 मधील भूधारकांनी सदरचे शेत मिळकत गट नंबर 310 मध्ये अतिक्रमण व कब्जा घेण्याचा वारंवार सतत प्रयत्न करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या लक्ष्मीबाई गायकवाड यांनी केला आहे. तसेच माझी एकच मागणी आहे की माझ्या शेतजमीन गट क्रमांक 310 च्या जमिनीचे सिमांकणासह मोजणी करून हद्द निश्चित करून पूर्ण होत नाही. तोपर्यंत मी दिनांक 9 जुलै 2025 रोजी मंगळवारपासून भूमी अभिलेख कार्यालय नांदगाव येथे लोकशाही मार्गाने अमर लोकेशन सुरू केले असून उपोषणाच्या दरम्यान माझ्या जीवितस किंवा माझ्या शेती मालमत्तेस तसेच माझ्या कुटुंबास काही कमी जास्त झाल्यास यास पूर्णपणे भूमि अभिलेख कार्यालय नांदगाव हे जबाबदार राहील असा इशारा उपोषणकर्त्या लक्ष्मीबाई गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
