
नांदगाव { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे मविप्र संस्थेचे माजी सरचिटणीस सहकारमहर्षी मालोजीराव मोगल यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आली. माननीय मुख्याध्यापिका काळे मॅडम,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापिका काळे मॅडम यांनी मालोजीराव मोगल यांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.निफाड तालुक्याचे तसेच नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार लोकनेते मालोजीराव मोगल यांनी ५० वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात मोलाचे योगदान दिले.मालोजीकाकांनी मौजे सुकेणे गावची ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमधून सहकार व राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली.त्यानंतर १९६० मध्ये निफाड सहकारी साखर कारखाना उभारणीच्या चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला.मविप्र शिक्षण संस्थेमध्ये सरचिटणीस असताना त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अतिशय भरीव काम केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते*
