लेखक:- प्रा. अशोक सोनवणे, नाशिक

अवयव दान चळवळीचे प्रणेते मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी संचालक आणि थोर समाज सुधारक डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्या दुःख निधन झाले ते 74 वर्षांचे होते त्यांच्यावर 2003 साली हैदराबाद येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये यकृत प्रत्यारोपणाचे शस्त्रक्रिया संपन्न झाली ही भारतातली पहिली यशस्वीपणे पार पडलेली यकृत प्रत्यारोपणाचे शस्त्रक्रिया होती 1997 साली ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत संचालक होते आणि तेव्हा त्यांना किरकोळ ताप येत होता पण तो नियमितपणे येऊ लागला आणि हा ताप का येतो याचे निदान लवकर होत नव्हतं आणि शेवटी निदान झालं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचे यकृत निकामी होत चालले त्यांनी नाशिक मधिल डॉक्टर, मुंबई मधील,डॉक्टर इंग्लंड मधिल डॉक्टर, सिंगापूर न्यूझीलंड, युरोपी देश आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक तज्ञ डॉक्टरांना त्यांचे प्रकृती दाखवली सर्वांनी एकच उत्तर दिल कि यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही यकृत प्रत्यारोपण करायचं कुठ परदेशामध्ये ही अवघड शस्त्रक्रिया होती आणि फार खर्चिक होती त्यांनी जेव्हा इंग्लंडमधल्या दोन डॉक्टरांना दाखवलं ते भारतीय होते एक होते डॉक्टर मोहम्मद रैला आणि दुसरे होते डॉक्टर धर्मेश कपूर या दोन्ही डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि या डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आलं कि आपली खरी गरज इंग्लंडमध्ये नसुन भारतात आहे अनेक रुग्ण हे यकृताच्या आजाराने त्रस्त आहेत आपण भारतात गेलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबाद मध्ये ग्लोबल हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं ही वार्ता डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांना कळली आणि म्हणून ते स्वतः ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरही प्रश्न हाच होता यकृत देणार कोण शेवटी त्या रुग्णालयाने त्यावेळच्या राष्ट्रीय दूरदर्शन वाहिनीवरून एक जाहिरात प्रसिद्ध केली ती जाहिरात अशी होती कि वन यंग डॉक्टर नीड्स लिव्हर एका तरुण डॉक्टरला लिव्हरची गरज आहे आणि ती जाहिरात लोकांनी बातमीपत्रामधून प्रसिद्ध होत असताना ती पाहिली तिकडे चेन्नईमध्ये डॉक्टर चित्रा नावाच्या डॉक्टर होत्या त्या रुग्णालयात काम करत होत्या आणि त्यांची मातोश्री त्याच रुग्णालयामध्ये परिचारिका होती त्या मातोश्री त्यांची ड्युटी संपून घरी आल्या आणि बाजारात भाजी आणायला गेल्या त्यांना रस्त्यामध्ये एक्सीडेंट झाला त्या अपघाताने त्यांच्या लहान मेंदूला मार लागला त्यांना जेव्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं या मेंदू मृत झालेल्या आहेत चित्रा डॉक्टरांच्या लगेच लक्षात आलं की मेंदू मृत होणं हाच माणसाचा अंत आहे त्यांनी ओळखलं की आता आपल्या आईचा आयुष्य संपलेल आहे त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं आणि त्यांनी ताबडतोब ग्लोबल हॉस्पिटलशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं मी तुमची जाहिरात पाहिली माझ्या आईचा अपघात झालेला असून त्या मेंदू मृत झालेल्या आहेत आणि मला त्यांचे यकृत दान करायचं आहे त्यानुसार मग ग्लोबल रुग्णालयाने डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्या सुविदय पत्नी सुप्रियाताई मोरे यांना सांगितलं. हैदराबाद हून डॉक्टरांची टीम खास विमान करून चेन्नईला पोहोचले चेन्नईमध्ये यकृत घेऊन ते हैदराबादला आले सलग 13 तास डॉक्टर मोरे यांच्या वरती यकृत प्रत्यारोपणाचे शस्त्रक्रिया झाली या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ५० बाटल्या रक्त लागलं रुग्णालयाने त्या शहरातल्या युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले व रुग्णालयासमोर रक्तदान करण्यासाठी युवकांची रांग लागली 13 तासानंतर शस्त्रक्रिया झाली डॉक्टर साहेबांना सव्वा महिन्यानंतर अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आलं लिव्हर अतिशय निरोगी होत त्या याकृताच डॉ मोरे यांच्या शरीरात प्रत्यरोपण करण्यात आले त्याचं पूर्ण रोपण झालं आणि डॉक्टर साहेब सहा महिन्यांनी नाशिकला आले त्यांना पत्रकार भेटायला गेले पत्रकारांनी प्रश्न विचारला आता तुम्हाला जे आयुष्य मिळालेले आहे त्यात तुमचे ध्येय काय डॉक्टर साहेबांनी फक्त एका वाक्यात उत्तर दिले आता इथून पुढे फक्त अवयवदान चळवळीचे प्रबोधन करणार तेव्हापासून तर आज पर्यंत डॉक्टर साहेब अवयव दानाच्या चळवळीत सक्रिय होते आम्ही अवयव दानाच्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी नाशिक नागपूर ते आनंदवन अशी पहिली पद यात्रा अवयवदान चळवळीची जागृतीसाठी काढली त्यानंतर नाशिक औरंगाबाद नांदेड बीड उस्मानाबाद आणि तुळजापूर अशी दुसरी पद यात्रा काढली नाशिक नगर पुणे कोल्हापूर बेळगाव ही तिसरी पदयात्रा काढली नाशिक पेन पनवेल रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गे पणजी अशी चौथी पदयात्रा काढली अनेक आमचे सहकारी यावर या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि या सर्वांनी मिळून अवयव दान चळवळीचा फार मोठा मोठा प्रचार या माध्यमातून केला संपूर्णपणे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दशक्रिया विधी किंवा वर्ष श्राद्ध विधी असेल त्या त्या ठिकाणी डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांना अवयवादानाचे प्रबोधन करण्यासाठी निमंत्रित केले जात असे जवळपास 200 पेक्षा जास्त अशा विधींमध्ये डॉक्टर साहेबांनी प्रबोधन केले त्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला असा एखादा रुग्ण असेल ज्याला किडनीचा विकार असेल किंवा फुफुसाचा असेल किंवा यकृताचा असेल ते डॉक्टर साहेबांशी संपर्क करायचे आणि डॉक्टर साहेब त्यांना अतिशय योग्य ते मार्गदर्शन करायचे अशा अनेक रुग्णांना त्यांनी खूप मौलिक मार्गदर्शन केलं काही रुग्णांना तर आर्थिक मदतही केली असा समाजसेवेचा वसा त्यांनी पूर्णपणे घेतलेला होता त्यांच्या या कार्याबद्दल तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्ढा यांनी नवी दिल्ली येथिल एक कार्यक्रमात त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आणि नाशिक मधील सुविचार मंचाच्यावतीने त्यांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . एकदा दोन तरुण त्यांना भेटावयास आले तो एक मुलगा एक मुलगी दोघेही आय आर एस झालेले होते. इन्कम टॅक्स मध्ये उच्च पदावर होते मुळामध्ये त्यांनी विवाह करायचा ठरवला तो आंतरजातीय विवाह होता त्यांनी असं सांगितलं की आम्हाला अवयवदान ही थीम घेऊन हा विवाह करायचा आहे डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांचा विवाह लावून दिला म्हणजे दुःखाच्या प्रसंगी किंवा आनंदाच्या प्रसंगी डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांनी अवयवदान प्रबोधनाचे काम अतिशय तडफेने केलं समाजाला मार्गदर्शन केलं समाजाची जागृती केली मराठा विद्या प्रसारक समाजामध्ये संचालक म्हणून काम करताना त्यांनी निरपेक्ष भावनेने काम केलं शिक्षणाचा दर्जा कसा सुधारला जाईल याच्यावर प्रामुख्याने त्यांनी भर दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळागाळातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कमी खर्चात आणि दर्जेदार शिक्षण कसे देता येईल हा आग्रह त्यांनी सातत्याने धरला त्यांच्या या सर्व कामांमध्ये त्यांच्या पत्नी सुप्रियाताई मोरे यांनी खंबीर साथ दिली डॉक्टर भाऊसाहेब मोरे आज आपल्यात नाहीत हि अवयवदान चळवळीचं कधीही भरून न येणार नुकसान झालेल आहे अवयव दान चळवळ अक्षरशा पोरगी झालेली आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं नाशिक येथील डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🏻🙏🏻💐💐प्रा. अशोक सोनवणे नाशिक
