
येवला (प्रतिनिधी). सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अतर्गत स्थलांतरीत उसतोड कामगाराच्या मुला –मुलीसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना अतर्गत ता, येवला जि नाशिक येथे मुला –मुलीन साठी 100 विध्यार्थी मान्य सख्या असलेले वसतिगृह सुरु करण्यासाठी सन -२०२५ -२६ मध्ये मान्यता मिळाली आहे. त्या अनुषगाने संत भगवान बाबा उसतोड कामगार मुलाचे वसतिगृह रमण बाग मनमाड रोड येथे श्री देशमुख याच्या इमारती मध्ये मजुरी मिळाली आहे. व मुलीच्या वसतीगृहासाठी संत भगवान बाबा उसतोड कामगार मुलीचे वसतिगृह चारी नं ३६ पाटोदा रोड बाभूळगाव ता. येवला जि नाशिक येथे श्री तान्हाबाई माधव पवार याच्या इमारती मध्ये वसतिगृह सुरु करण्यासाठी मजुरी दिली आहे. सदर शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता ५ वी ते पदवी / पदवीत्तर शिक्षण घेणारी उसतोड कामगाराची मुले / मुली /पाल्य प्रवेशास पात्र रहातील सदर वसतिगृहामध्ये प्रवेशित मुला /मुलीन साठी भोजन अथरून ,पांघरून ,वह्या पुस्तके ,इतर सुविधा अनुज्ञेय रहातील येवला तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मुलाचे वसतिगृहाचे अधीक्षक श्री महेश काळमेख व मुलीच्या वसतिगृहातील अधीक्षका श्रीमती हिरे जयश्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय केले आहे. वसतिगृह प्रवेशासाठी अर्जा सोबत जोडत असलेली कागदपत्रे खालील प्रमाणे १)आई / वडील पालक नियमित स्वरूपात उसतोड कामगार असल्याचे तलाठी/ ग्रामसेवक दिलेले उसतोड कामगार प्रमाणपत्र २)विध्यार्थ्याचा जातीच्या दाखला झेरोक्स ३)विध्यार्थी आधार कार्ड झेरोक्स ४)वडीलाचा मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ५)गत वर्षाचे पास झाल्याचे गुणपत्रक ६) 2 फोटो पासपोर्ट साईज ७)शाळा सोडल्याचा दाखला झेरोक्स व बोनाफाईड संपर्क मोबाईल नंबर-१) श्री. महेश काळमेख(प्रभारी गृहपाल मोबाईल नं .९२७३७५९५१४२) श्रीमती हिरे जयश्री (प्रभारी गृहपाल मोबाईल नं ८९९९८८५०९१
