
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६१ वा दिवस*
धर्म केवळ विभिन्न जातीनुसार वा विभिन्न देशानुसारच भिन्न-भिन्न धर्माच्या रूपात प्रकट होतो असे नाही, तर व्यक्ती व्यक्तीच्या पात्रतेनुसारही तो निरनिराळे रूपे धारण करीत असतो. कुण्या एखाद्या व्यक्तीत धर्म प्रबल कर्मशीलतेच्यारूपाने, कोणात प्रगाढ भक्तीच्या रूपाने, कोणात योगाच्या रुपाने तर एखाद्या व्यक्तीत ज्ञानाच्या रूपाने प्रकटतो. तुमचा मार्ग बरोबर नाही असे आपण इतरांना म्हणणे वस्तुतः चुकीचे आहे. सारांश, व्यक्ती व्यक्तीमध्ये कितीही भिन्नता असली तरीदेखील त्या समस्त भिन्नतेत चिरंतर समन्वय, अखंड एकत्व विराजत आहे. आपल्याला हेच ओळखावयाचे आहे.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १८ आषाढ शके १९४७
*★ आषाढ शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ९ जुलै २०२५
★ १९२१ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक, जनसंघ पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील पहिले आमदार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रामभाऊ म्हाळगी यांचा जन्मदि
.★ १९२५ राष्ट्रपतीपदक पुरस्कृत हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरुदत्त यांचा जन्मदिन.
★ १९३८ प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्
