
नांदगाव (प्रतिनिधी)*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना बाबत आमदार सुहास आण्णा कांदे यांचे अध्यक्षतेखाली करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना संबंधी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे आढावा बैठक संपन्न झाली. सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या योजनेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे.या योजनेमुळे मनमाड करांच्या माथी असलेला पाणीटंचाईचा कलंक पुसला जाणार आहे
