
नांदगाव (वार्ताहार)-नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित व्ही.जे.हायस्कूल नांदगाव येथे मंगळवार दिनांक ८/७/२०२५ रोजी ‘मनशक्ती’ प्रयोग केंद्र लोणावळा आयोजित ‘यशनिश्चित’ दिन कार्यक्रम गुरुदक्षिणा सभागृहात मोठ्या उत्सहात संपन्न झाला. ‘मनशक्ती’ प्रयोग केंद्र ही एक सामाजिक कार्य करणारी ‘विज्ञान निष्ठ’ संस्था आहे. विद्यार्थांनी तणावमुक्त अभ्यासातून यशप्राप्ती कशी करावी..? ह्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अकादमी बोर्ड अध्यक्ष मा.डॉ.सारंग इंगळे ,माजी मुख्या . श्रीम.मीनाक्षी गोळे, अध्यक्ष संकुल प्रमुख मा.श्री.संजीव धामणे, मनशक्ती केंद्राचे साधक मा.श्री.विनय पटवे, मा.श्री.जयवंत रावळे, सौ.जयश्री रावळे, सौ.मृणाल इंगळे शाळेचे मुख्या .श्री.लक्ष्मीकांत ठाकरे ,उपमुख्या . श्री.मिलिंद श्रीवास्तव, कार्यक्रम प्रमुख व अकादमी बोर्ड सदस्य सौ. रुपाली झोडगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवतेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मान्यवरांचा परिचय सौ. रुपाली झोडगेकर ह्यांनी करून दिला. उपस्थित मान्यवराचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्या . श्री.मिलिंद श्रीवास्तव ह्यांनी केले. विद्यार्थांना तणावमुक्त अभ्यासातून यश प्राप्ती कशी करावी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल..? हा हेतू समोर ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पहिल्या सत्रात सकाळ सत्रातील विद्यार्थासाठी ,दुसऱ्या सत्रात शिक्षकांसाठी व तिसऱ्या सत्रात दुपारील विद्यार्थासाठी कार्यक्रम घेण्यात आला. पहिल्या सत्रात इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थांना प्रत्यक्षात मा.श्री.विनय पटवे यांनी मार्गदर्शनास सुरवात केली. ह्यात कमी वेळेत जास्त अभ्यास कशा प्रकारे करावा ..? अभ्यासाची जागा,वेळ,दिशा,आपल्या मेंदूचे कार्य हे विज्ञानाच्या आधारे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना अभ्यास,आदर व इच्छा ह्या गोष्टींसाठी आपण वैज्ञानिक दृष्टीकोनातून आपले शरीर व मन कशा प्रकारे तयार करायचे..? ह्याचे मार्गदर्शन केले. इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना सौ.मृणाल इंगळे,व सौ.जयश्री रावळे यांनी वर्गात जाऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात शिक्षकांची मनशक्ती यात ‘पिढी घडविणारे शिक्षक’ ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सौ.रुपाली झोडगेकर ह्यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. मा.डॉ.सारंग इंगळे ह्यांनी ‘पिढी घडविणारे शिक्षक’ ह्या विषयावर मार्गदर्शन केले. ह्यात आजच्या शिक्षकांना विविध प्रकारे मनावर ताण असतो.., त्यातून त्या शिक्षकांचे आरोग्य ही बिघडते ह्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षकांचे मनशक्तीचा वापर करून आपली पिढी कशी चांगली होईल..? ह्याविषयी मार्गदर्शन केले.त्याचबरोबर निसर्गाच्या नियमाने वागून आपले आरोग्य कसे चांगले होईल त्यासाठी आपला आहार, व्यायाम, उपवास, शरीरासाठी लागणारे पाणी ह्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तथा शिक्षकाच्या शंकाचे छान पद्धतीने निरसन केले.शेवटी मा.मुख्या . लक्ष्मीकांत ठाकरे यांनी मागर्दर्शना बद्दल आभार मानले ह्या कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नक्कीच फायदा होईल..; ह्यांसह सर्व शिक्षकांच्या मनशक्ती व आरोग्य ह्या दोनही बाबीत निश्चितपणे बदल होतील..; अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.निवेदीता सांगळे ह्यांनी केले. कार्यक्रमासाठी टी.एम. सदस्य श्री.गुलाब पाटील ,श्री.भास्कर मधे आदींसह शाळेतील सर्व पदाधिकारी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते यांचे मोलाचे सहकारे लाभले.——————
