
निगडोळ (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरद रावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता. दिंडोरी येथे मंगळवार दि.८जुलै २०२५ रोजी पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार कापडणीस एन.जे.यांनी पालक मेळाव्याचे सुंदर नियोजन केले.अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन मा.बबनरावजी मालसाने यांनी अध्यक्षस्थान भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून निगडोळ ग्रा.पं.चे सरपंच कृष्णा रहेरे व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य संजय मालसाने हे उपस्थित होते.मा.अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते कर्मवीर व सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले.मुख्याध्यापक बोरसे डी.डी. यांनी प्रास्ताविक केले.शिष्यवृत्ती परीक्षा,मिनी गुरुकुल,विविध शालेय उपक्रम व स्पर्धा परीक्षांची माहिती पालकवर्गाला ज्येष्ठ शिक्षक बेद्रे एस.व्ही.यांनी दिली.कृत्रिम बुद्धिमत्ता(AI)विषयी माहिती कापडणीस एन.जे.यांनी दिली.विद्यालयात राबविले जाणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कला क्रीडा संदर्भात माहिती वाघमारे ए.बी.यांनी दिली.यावेळी सन-२०२५-२६ साठी पालक-शिक्षक संघ,शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन व विकास समिती पुनर्गठीत करण्यात आली.पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी भास्कर रामनाथ मालसाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष म्हणून बबनराव यशवंत मालसाने यांची नियुक्ती करण्यात आली.शैक्षणिक फी,विविध समित्या व विद्यालयातील महत्त्वपूर्ण घटकांवर पालक व शिक्षक यांच्यात साधक बाधक चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापडणीस एन.जे.यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा गायकवाड यांनी केले.विकास देवरे व भामरे टी.व्ही.यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.अशारितीने निगडोळ विद्यालयातील पहिल्या सत्रातील पहिला पालक मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.
