
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात सहकार महर्षी काकासाहेब मोगल यांच्या प्रतिमापूजन प्रसंगी प्राचार्य दवंगे, भाऊसाहेब भंडारे व आदी
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता 8- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मविप्र संस्थेचे माजी सरचिटणीस व सहकार महर्षी कै कर्म मालोजीराव तथा काकासाहेब मोगल यांची जयंती व पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, स्कूल कमिटीचे सदस्य भाऊसाहेब भंडारे, प्रमुख अतिथी चंद्रकांत मोरे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,पर्यवेक्षक राजेश खताळ, अभिनवचे मुख्याध्यापक राहुल मोगल, कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे,प्रा सचिन भंडारे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी चंद्रकांत मोरे प्राचार्य दवंगे यांनी काकासाहेब मोगल यांच्या सहकार राजकीय व शैक्षणिक कार्याची माहिती करून दिली . सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार बाळासाहेब गडाख यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
