
नांदगाव ( प्रतिनिधी )धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गिरणा नांदगाव पाणी योजनानांदगाव शहराला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी गिरणा नांदगाव पाणी योजना राबवण्यात येत आहे. या वेळी ठेकेदारांनी माहिती दिली की, ही योजना साधारणपणे पुढील ६ महिन्यांत पूर्ण केली जाईल. आमदार सुहास कांदे, यांनी यावेळी कामाच्या दर्जावर आणि वेळेच्या काटेकोर अंमलबजावणीवर विशेष भर देत, “नांदगावकरांना दर्जेदार पाणी देणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही अडथळ्यामुळे नागरिकांचे हक्क डावलले जाणार नाहीत,” असे ठामपणे सांगितले एकत्रित ध्येय आणि संकल्पया आढावा बैठकीत तांत्रिक बाबी, निधी व्यवस्थापन, अंमलबजावणीची अडचणी, तसेच पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामात गती आणण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पावले त्वरित उचलण्याचे निर्देश देण्यात आले.या योजनांमुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दीर्घकाळ चालत आलेली पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे.बैठकीदरम्यान आमदार सुहास कांदे यांनी सांगितले, “ही केवळ विकास योजना नाहीत, तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आयुष्याचा भाग आहेत. पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणे, हे माझे पहिले कर्तव्य आहे.”या बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी आपली जबाबदारीची जाणीव व्यक्त करत, काम वेळेत आणि योग्य दर्जाने पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले.योजनेच्या प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, नागरिकांना वेळोवेळी माहिती पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या बैठक प्रसंगी अंजुम कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, ठेकेदार अविनाश शिरसाठ, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) कचवे, तसेच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शामकांत जाधव, उपस्थित होते.
