
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६० वा दिवस
हे विश्व स्वतःची रहस्ये आम्हाला उघडी करून दाखवायला तयार आहे, स्वतःच्या रहस्याची द्वारे आमच्यासमोर उघडायला राजी आहे; मात्र त्यासाठी ते दार कसे ठोठवायाचे, त्यावर आवश्यक तेवढा धक्का कसा मारायचा, हे आम्हाला अवगत असले पाहिजे. तो धक्का देण्याला आवश्यक असलेली शक्ती आणि जोर एकाग्रतेतूनच निर्माण होत असतो. मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही. ते जितके अधिक एकाग्र होईल, तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल. हेच या बाबतीतील रहस्य होय.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १७ आषाढ शके १९४७*
★ आषाढ शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ८ जुलै २०२५
★ १७८९ मराठ्यांचा इतिहास लिहिणारा पहिला ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ यांचा जन्मदिन.
★ १९१६ साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्मदिन.
★ २००८ महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभलेले आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा स्मृतीदिन.
★ अलर्जी प्रतिबंध दिन…
