
पेठ (प्रतिनिधी )म वि प्र समाज, अनुदानित आश्रम शाळा पेठ येथे इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान शाखेतील नवीन प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष दळवी होते. कार्यक्रमाची सुरवात विद्येची देवता सरस्वती पूजनाने झाली. प्रास्तविक आणि सूत्रसंचालन श्री राजेंद्र चव्हाण सरांनी केले. श्री योगेश पवार आणि श्री गोरख दाते सरांनी विध्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.

पालकांनी शाळेसाठी वेगवेगळ्या झाडांची रोपे भेट दिलीत. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दळवी सरांनी शिस्तीचे महत्व सांगितले.विध्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री भुरभूडे सर, बच्छाव सर, भोये सर, अधिक्षिका ठाकरे मॅडम तसेच गोवर्धने आणि समाधान अहिरे आधीनी परिश्रम घेतले. शेवटी श्री भुरभूडे सरांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

