
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९५९ वा दिवस
अन्याय करू नका. कोणालाही अकारण दुखवू नका. इतरांचे जेवढे भले करता येईल तेवढे करा. पण दुसरे कोणी अत्याचार करीत असतील तर ते मुकाट्याने सहन करणे हे गृहस्थधर्माच्या दृष्टीने मोठे पाप होय. ठकाशी तिथल्या तिथेच महाठकच झाले पाहिजे. गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळविली पाहिजे. आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले पाहिजे. त्यांच्या सुखसुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत. एवढेही तुम्ही करू शकला नाहीत तर मग स्वतःला माणूस कसले म्हणवता? तुम्ही साधे गृहस्थधर्मी सुद्धा नाही; मग मोक्षाच्या पोकळ गोष्टी कशासाठी?
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १६ आषाढ शके १९४७*
★ आषाढ शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ७ जुलै २०२५
★ १८५४ कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरु केली.
★ १९१२ लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई (तापीबाई) टिळक यांचा स्मृतीदिन
★ १९६२ सुप्रसिध्द गायिका “स्वरचंद्रिका” पद्मजा फेणाणी यांचा जन्मदिन.
★ १९८१ क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्मदिन.
★ जागतिक चॉकलेट दिन.
