
मूळ डोंगरी (प्रतिनिधी). दिनांक 5 जुलै 2025 श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी वारकरी वेष परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन हातात टाळ – चिपळ्या घेऊन मुखी पांडुरंगाचा नामघोष करत विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचा अनुभव घेतला. *आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडीने साऱ्यांचे लक्ष वेधले.* यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस.जी. राठोड साहेब व सचिव श्री सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाचे मुख्याध्यापिक सौ बोरसे एस एस मॅडम , यांच्या हस्ते विधिवत पालखीचे व विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करण्यात आले. दिंडीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळ्यात सहभाग घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला. दिंडीचा समारोप विदयालया च्या प्रणांगणात करण्यात आला. यावेळी प्रसाद म्हणून विद्यार्थ्यांना केळी व पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी दिंडी यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. व शिक्षकेत्तर सेवकांच्या मदतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले.
