
मोहाडी (बातमीदार) मविप्र समाज संचलित आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर मोहाडी शाळेत देवशयनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमासाठी दिंडोरी पेठ मविप्र संचालक श्री प्रवीण जाधव अभिनव शालेय समिती अध्यक्ष रामराव पाटील श्री सुरेश सोमवंशी,श्री विजय जाधव श्री रविकांत जाधव श्री उत्तम काका जाधव श्री एस एस जाधव श्री दीपक जाधव डॉ.चंद्रकांत पाटील श्री भास्करराव जाधव श्री अशोकराव जाधव श्री सुरेश पाटील श्री सुरेश जाधव श्री एल टी गुरुजी व प्राचार्य शरयू भामरे पर्यवेक्षक श्री रवींद्र निकम ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव सह अभिनव मुख्याध्यापिका श्रीम.सोनाली देशमुख इत्यादी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व पालखी पूजन विठ्ठलाची आरती घेण्यात आली. कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ सोनाली देशमुख यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या तर *हातामध्ये टाळ घ्या खांद्यावर वीणा* हे विठ्ठल गीतातून सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीम.धनश्री शंखपाळ यांनी भक्तीमय वातावरण केले. अद्विक जाधव रुई पाटील अभिनव विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले मान्यवरांच्या उपस्थित दिंडी काढण्यात आली उपशिक्षिका रोहिणी लोखंडे यांनी आषाढी एकादशीची माहिती उपस्थितांना सांगितली, बालगोपाळांनी रिंगण सोहळा व फुगडी नृत्य सादर करून वातावरण विठुमय केले. विद्यार्थ्यांनी *झाडे लावा झाडे जगवा.* *झाडे लावा पाऊस वाढवा.* घोषवाक्य द्वारे पर्यावरण जतन जागृतीचा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती इखे तर शालिनी जाधव आभार मानले. विठुरायाचे सुंदर असे फलक लेखन कलाशिक्षक धनंजय जाधव कृष्णा जाधव यांनी केले
