
नांदगाव (प्रतिनिधी)…दिनांक ५ जुलै रोजी आषाढी एकादशी दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागूल सर व उपाध्यक्ष सौ.सरिता बागूल मॅम यांच्यातर्फे एका अनोख्या आषाढी दिनाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.या वेळी मा.मॅनेजमेंट श्री.सार्थक बागूल,स्कूलचे प्रिन्सिपल मिस.वासंती नटराजन मॅम यांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर पालखीचे पूजन झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात आलेल्या चि.शिवांश खैरनार चि.शिवांश चौधरी चि.विनीत पांडे कु.सिया खैरनार व कु.मयुरी शिंदे या विद्यार्थ्यांची देखील भगवंत स्वरुप पूजा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकादशीचे महत्त्व मिस. विजेता परदेशी व इ.६ वी.च्या कु.समृद्धी मोरे कु.आराध्या गोराडे इ.८ वी कु.श्रावणी राजोळे यांनी सांगितले. रेनबो स्कूलचे इ. ४ थी ते ६ वी चे विद्यार्थी आणि लिटिल स्टारचे इ.६ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यानीअप्रतिम डान्स सादर केला. स्कूल मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीनी वारकरी ड्रेस मध्ये उपस्थित होते. या अद्वितीय सोहळ्यात दिंडीमध्ये फुगडी, भव्य वारीचे रिंगण, भगवा झेंडा पताका, विणा वादन, टाळ वादन, डीजे वादन, चिमुकले वारकरी व लेझीम पथकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमात विशेषतः मा.मॅनेजमेंट, शिक्षक, शिक्षिका व सर्व विद्यार्थीनी या अनोख्या वारीचा आनंद एका वारकरी स्वरुप घेतला. मा.मॅनेजमेंटकडून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खास प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस अनिता जगधने यांनी अतिशय सुंदररित्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे प्रिन्सिपल व सर्वानी अपार मेहनत घेतली.
