
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात आषाढी (देवशयनी) एकादशीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला तासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थीनींनी वारकरी पेहराव करून डोक्यावर तुळशी वृंदावनासह गावातुन भजन, भारुडे व गवळणी म्हणत दिंडी काढण्यात आली.निसाका कार्यस्थळावरील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत दिंडी नेण्यात आली.व तिथे मोठ्या उत्साहात विविध भक्ती गीते सादर करून ख-या अर्थाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.शेवटी मंदिरात पांडुरंगाच्या आरतीने दिंडीचा समारोप करण्यात आला.आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यालयात भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त विद्यार्थीनींनी अभंग, गवळणी, भारुडे सादर केली.भजन स्पर्धांचे परीक्षण सौ.संगीता ननवरे व सौ.गोराडे यांनी केले विद्यालयाच्या सर्व विद्यार्थीनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होते.
