
“न्यायडोंगरी (ता. नांदगाव) – श्री शनैश्वर सेवाभावी संस्था, न्यायडोंगरी संचलित स्व. अण्णासो गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, न्यायडोंगरी येथे आज दिनांक 7 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या विविध वेशभूषांच्या भव्य दिंडीने झाली. टाळ, मृदुंग, विणा यांच्या गजरात “विठू माऊली”चा जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी होऊन वारकरी सांप्रदायाची अनुभूती दिली.दिंडी पुन्हा शाळेच्या आवारात परत आल्यानंतर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती, संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि विठोबाचा फोटो यांच्या साक्षीने आरती करण्यात आली. आरती मान्यवरांच्या हस्ते पार पडली. संस्थेचे सरचिटणीस मा. अनिलकुमार आहेर आणि परिसरातील मान्यवर नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने विठ्ठलनाम संकीर्तनाने वातावरण भारावून गेले. संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागाने भक्ती आणि संस्कृती यांचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला.
