
नांदगाव (प्रतिनिधी)नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री.कैलास दामू उगले* यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. *श्री. कैलासजी उगले हे शेतकरी असून ते गेल्या 12 वर्षांपासून पंढरीची नियमित वारी करत आहेत.* आज पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आषाढीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली *मानाचा वारकरी म्हणून श्री.कैलासजी व सौ.कल्पना उगले यांना ही महापूजा करण्याचा मान मिळाला आहे.*
