
संस्कार मित्र मंडळ गुण गौरव सोहळा मध्ये विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना साहित्यिक सुहास टिपरे व्यासपीठ वर आडवोकेट श्री केंगे,, मा. नगरसेविका किरण ताई दराडे, मा पोलीस उप आयुक्त सीताराम कोल्हे, व युवा नेते बाळासाहेब दराडे
नासिक ( प्रतिनिधी)= हल्ली च्या विद्यार्थी चा मोबाईल वापर हा प्रचंड वाढला आहे. त्या मुळे तरुण पिढी चा अमूल्य वेळ वाया जात आहे विद्यार्थी यांनी तो वेळ चांगल्या पुस्तकं वाचणाकडे केंद्रित करावे असे मार्गदर्शन विद्यार्थी गुण गौरव सोहळा मध्ये प्रमुख पाहुणे साहित्यिक सुहास टिपरे यांनी काढले संकट मोचक संस्कार मित्र मंडळ आयोजित विद्यार्थी गुण सोहळा मध्ये साहित्यिक सुहास टिपरे यांनी विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केलें. ज्या सुर्वे वाचनालय मध्ये कार्यक्रम सुरु आहे त्याच सुर्वे नारायण यांनी “” वाचाल तर वाचाल “” हा मंत्र दिला आहे विद्यार्थी यांनी चांगल्या लेखक यांची पुस्तके वाचावीत. मोबाईल चा कमीत कमी वापर करावा संस्कार, शिस्त, वाचन आई वडील यांचा आदर इत्यादी विषयी सुहास टिपरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केलें. या प्रसंगी श्री सीताराम कोल्हे, माजी पोलीस उप आयुक्त, श्री मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस स्टेशन, श्री नागेश मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर गुन्हे शाखा, श्री डॉक्टर सागर मंडलिक, संचालक वक्रतुंड हॉस्पिटल नासिक व आडवोकेट केंगे या सर्वांनी आपल्या भाषणात बहू मूल्य मार्गदर्शन केलें. सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी यांना कार्यक्षम मा. नगर सेविकl किरण ताई दराडे व राजकीय युवा धडाडीचे नेते बाळासाहेब दराडे यांचे वतीने शालेय बॅग व अन्य साहित्य वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम चे सूत्रसंचालन युवा नेते बाळासाहेब दराडे यांनी केलें व कार्यक्रम चे आभार मा. नगर सेविका किरण ताई दराडे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कार मित्र मंडळ चे अध्यक्ष दीपक गामने,उप अध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, सचिव राजेंद्र गामने,ऋषिकेश ताजने, खजिनदार आशिष सिंग, सल्लागार,श्री सुरज शिंदे, सरचिटणीस व गणेश भुरक,उप अध्यक्ष व श्री विकी सांगळे इत्यादी खुप मोलाचे सहकार्य केलें व कार्यक्रम यशस्वी ते साठी परिश्रम घेतले श्री बाळासाहेब दराडे व किरण ताई दराडे यांनी पुष्प गुच्छ व सुंदर फोटो फ्रेम सर्व प्रमुख पाहुणे यांना देऊन सन्मानित केलें. कार्यक्रम चा समारोप आभार प्रदर्शन सौं किरण ताई दराडे यांनी केला. सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना बाळासाहेब व किरण ताई यांनी चांगले गुण संपादन केल्या बद्दल छान चविष्ट खाद्य पदार्थ ची मेजवानी दिली. कार्यक्रम खुप चांगला संपन्न झाला.
