
नांदगाव (प्रतिनिधी ) दिनांक 5 जुलै 2025 श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित श्री साईज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण पुरक दिंडीचे आयोजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी वारकरी वेष परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन हातात टाळ – चिपळ्या घेऊन मुखी पांडुरंगाचा नामघोष करत विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचा अनुभव घेतला. *आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची दिंडी व पर्यावरण पूरक दिंडीने साऱ्यांचे लक्ष वेधले.* यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस.जी. राठोड साहेब व सचिव श्री सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रविंद्र व्ही. जाधव सर, पर्यवेक्षक पतिंग चव्हाण सर (मामा ) या सर्वांच्या हस्ते विधिवत पालखीचे व विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करण्यात आले. व दिंडी शुभेच्छा देत गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे भजनाच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या निनाद करत मार्गस्थ करण्यात आली. त्यातून *वृक्षारोपणाचा संदेश देत जनजागृती करण्यात आली.* दिंडीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यालयातील गणपती मंदिरासमोरील प्रणांगणात विठुरायाच्या भजनांनी व सर्व वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्या सहभाग घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला. दिंडीचा समारोप विदयालया च्या प्रणांगणात करण्यात आला. यावेळी प्रसाद म्हणून विद्यार्थ्यांना केळी व पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी दिंडी यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. व शिक्षकेत्तर सेवकांच्या मदतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले.
