कवी प्राचार्य:-देवदत्त बोरसे
रयत शिक्षण संस्थेचे,मा.श्री.श.प.विद्यालय.निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.
आज आषाढी एकादशी निमित्त कवी प्राचार्य देवदत्त बोरसे सर यांनी अभंगाच्या माध्यमातून पांडुरंगाचे सुंदर गुणगाण सादर केला आहे. तो अभंग देत आहोत.

*अभंग
माझा पांडुरंग I जगाचा विधाता Iकर्ता करविता I या सृष्टीचा..॥
तोच मायबाप I जीवाचा आधार Iकरितो उद्धार I जीवनाचा..॥
भक्तीचा भुकेला I देव माझा भोळा Iरुपाचा सावळा I आंर्तयामी..॥
अठ्ठावीस युगे I हात कटीवर Iउभा विटेवर I पंढरीत..॥
आषाढीची वारी I विठ्ठल हृदयी Iजाई पायी पायी I वारकरी..॥
माय रखुमाई I बाप विठूराया Iआभाळाची माया I हृदयात..॥
स्वीकार विठोबा I देवाचा अभंग Iघडू दे सत्संग I आयुष्याचा..॥
