
लोहशिंगवे (प्रतिनिधी). जि.प. प्राथमिक शाळा लोहशिंगवे ता. नांदगाव, जि. नाशिक येथे दिंडी सोहळा आयोजित केला होता हा सोहळा- विद्यार्थ्यांचा सहभागाने साजरा झाला एक अध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सव वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी आणि विद्यार्थ्यांच्या संस्कारांची जोपासना करणारी अशी ही आषाढी वारी दिंडी सोहळा २०२५ मध्ये शाळेमध्ये मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आला , सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता

विद्यार्थ्यांचा सहभाग:लेक-लेकींनी पारंपरिक पोशाख परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिगीते म्हणत गावातून दिंडी काढली.“ जय हरी विठ्ठल,ज्ञानोबा-तुकाराम” या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला.विद्यार्थ्यांनी भजन, अभंग गायन, पाळणे, वेशभूषा स्पर्धा, यात भाग घेतला.वारकऱ्यांचा पोशाख, भगवे झेंडे, विठोबा-माऊलीच्या मूर्ती, —सर्व काही विद्यार्थ्यांनी साकारले होते. महिलांनी ठिक ठिकाणी दिंडीचे पूजन करून स्वागत केले. आपल्या सांस्कृतिक परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी.समूहशिस्त, भक्तीभाव, सामाजिक एकात्मता व परिश्रमाचे महत्त्व शिकवणे.विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण व्हावा व भाषिक, सादरीकरण कौशल्य वाढवावे. विशेष क्षण: विठ्ठलाच्या मंदिरासमोर मुलींनी,मुलांनी फुगडी खेळली.शाळा आवारातून सुरू झालेली दिंडी गावातून फेरी करत पुन्हा शाळेत आली. शेवटी…मुख्याध्यापक श्री बाबुलाल ठोंबरे सर यांनी श्री जाधव सर,श्री संदीप पाटील सर श्री जगताप सर, श्री तोलमारे सर,श्री लोटे सर,श्री योगेश पाटील सर व यशस्वी सहभागबद्दल आभार मांडले.या पवित्र दिंडी सोहळ्याने शाळेतील आणि गावातील प्रत्येकाच्या मनात अध्यात्मिक आनंद निर्माण केला. शाळेच्या वारीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक लेक-लेकांचे सर्व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले.
