
पिंपळगाव बसवंत -: (प्रतिनिधी). निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय,अभिनव बाल विकास मंदिर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त पालखी दिंडी सोळा मोठ्या उत्साहात पार पडला. या आषाढी विद्यार्थी दिंडी सोहळा मध्ये एकूण 1300ते 1400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री विश्वासराव मोरे उपस्थित होते. व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष जयराम मोरे समाजभूषण हभप श्री कचेश्वर महाराज तसेच तिनही ज्ञान संकुलाचे शालेय समिती सदस्य कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश जाधव, कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय चे मुख्याध्यापक संजय डेर्ले, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा धारराव उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे,पालखीचे पूजन करण्यात आले.विठ्ठल रुक्मिणीची आरती घेण्यात आली.

विद्यालयातील बालगोपालांनी संत गोरोबा काका कुंभार यांच्या कार्याची माहिती नाटकातून सादर केली विद्यार्थिनींनी रिंगण सोहळ्याचे सुंदर असे प्रदर्शन केले आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भजन, तसेच विठ्ठल नामाचे व दिंडीचे महत्व छोट्याशा कीर्तनातून सादर केले.मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री विश्वासराव मोरे श्री जयराम मोरे, कचेश्वर महाराज यांनी पालखी घेऊन दिंडी सोहळ्यास प्रारंभ केला.इयत्ता 4वी ते १० वी च्या दोन्ही ज्ञान संकुलातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकरी वेशभूषा सादर केली होती.यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची, विविध संतांची वेशभूषा तसेच मुलींनी नऊवारी साडी,डोक्यावर तुळस व मुलांनी वारकरी पोशाख,हातात टाळ,मृदंग,वीणा घेऊन दिंडीत सहभागी झाले होते. आषाढी दिंडी सोहळ्यामध्ये पालखी, वेशभूषा रथ, ढोल पथक, लेझीम पथक, ध्वज पथक, टाळ पथक, तुळशी वृंदावन विदयार्थीनी यांचा समावेश करण्यात आला होता.पिंपळगाव बसवंत गावातून दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळेस अनेक महिलांनी पालखीचे पूजन केले.गावातील बस स्टॅन्ड,मुख्य चौकामध्ये व शालेय क्रीडांगणावर विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर असा रिंगण सोहळा पार पडला.यामध्ये गोल रिंगण,उभे रिंगण,फुगडी यांचा विद्यार्थी व शिक्षकांनी भरपूर आनंद घेतला.संतांच्या घोषणांनी, अभंगांनी,टाळमृदुंगांनी, रांगोळ्यांनी परिसर भक्तीमय होऊन आनंदाने न्हाऊन गेला होता. आषाढी दिंडी सोहळ्याचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली धोंडगे आभार जगदीश कुशारे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय डेर्ले, सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो = जनता विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखीचे पूजन करतांना मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री विश्वासराव मोरे श्री जयराम मोरे, कचेश्वर महाराज व सर्व मान्यवर.याप्रसंगी मुख्याध्यापक संजय डेर्ले,शिल्पा धारराव ,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
