
्वडांगळी..(प्रतिनिधी). येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बालविकास मंदिर या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त आज पारंपारिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके युवा सभासद विक्रम माधवराव खुळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्वांनी पालखीचे पूजन केले. तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, विजय कोकाटे, कैलास काळे, सुभाषराव ठोक, शीला आवारे, स्मिता वाघ,संदीपराव म्हस्के यांनी पालखीचे पूजन केले यावेळी शिक्षक शिक्षिका आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी छान पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती .अभिनव बाल विकास मंदिर चे विद्यार्थी,ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी तसेच माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या वेशभूषा केल्या होत्या. सकाळी शाळेच्या प्रांगणातून दिंडीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल नामाचा गजर केला .कीर्तन व धार्मिक वातावरण निर्माण करून वारकऱ्यांच्या वेशात असलेल्या मुलांनी सुंदर असे सादरीकरण केले.फुगड्या घालून शिक्षिका व विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. संगीत शिक्षक सचिन सानप, क्रीडाशिक्षक विलास गोसावी, कैलास काळे, राजेंद्र गीते प्रशांत पाटील यांनी विविध अभंग व गवळणी सादर करून संपूर्ण गावातून मिरवणुकीत सहभाग घेऊन भक्तिमय वातावरणात दिंडीत रंगत आणली. यानंतर विद्यालयात रिंगण सोहळा पार पडला यामध्ये अश्व रिंगण सोहळा, खांद्यावर पताका घेऊन शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पारंपारिक नृत्य सादर करून दिंडीमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव सांगळे यांनी केले त्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना केळी व फराळाचे वाटप करण्यात आले. आभार बाळासाहेब आडसरे यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
