
हिरवळ (खुर्द) आषाढी एकादशी निमित्त शनिवारी प्रा. शाळा हिसवळ खुर्द,आहेर वस्ती शाळा तसेच माध्यमिक विद्यालय हिसवळ खुर्द आणि गांवकरी भजनी मंडळ यांनी वारी पंढरीची दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.लहान चिमुकले छान विठ्ठल रखुमाई बनले.गावातील फेरीत ठिकठिकाणी विठ्ठलाची व रखूमाईचे बायकांनी औक्षण केले.अशा आनंदमय प्रसंगी विठूरायाची दुमदुमली पंढरी सारखे रूप आले होते.गावक-यांनी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. हा आनंद सोहळा चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटुन दिसत होता.

