
मुंबई (प्रतिनिधी) : प्रशासकीय सेवेत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य करत असतानाच उर्दू साहित्यविश्वात आपल्या संवेदनशील लेखनशैली, प्रभावी गझला आणि सामाजिक जाणिवांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय शायर तथा अप्पर जिल्हाधिकारी मा. मोनिका सिंह यांच्या शुभहस्ते ‘गावगाडा पुरस्कार २०२५-२६’ प्रदान करण्यात आला.‘ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार’ या अभ्यासपूर्ण व दर्जेदार ग्रंथाचे लेखक श्री. रमाकांत नारायणे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनसंघर्षाला शब्दबद्ध करत समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या ग्रंथाला साहित्य व सामाजिक क्षेत्रातून मोठी दाद मिळत आहे.पुरस्कार प्रदान समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा. मोनिका सिंह यांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून लेखकांनी सामाजिक वास्तव मांडत जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे करावे, असे प्रतिपादन केले.
