
सोनांबे (प्रतिनिधी) !सोनांबे जनता विद्यालयाने आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.दिंडीतील वारकरी पावलिने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.विद्यालयाच्या प्रांगणात शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार,सदस्य निवृत्ती बोडके,भाऊसाहेब विठ्ठल पवार,दिलीप पवार,सुनील पवार,पालक संघ उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचे व पालखीचे पूजन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे ,पर्यवेक्षक दिगंबर जाधव,कचरू पाटील पवार,भाऊसाहेब सखाराम पवार,सुधाकर नवले,अमोल पवार,नरहरी पवार,मनोहर पवार, भारत पवार,तानाजी पवार आदी मंचावर उपस्थित होते.वारकरी पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी पावली सादर केली.सजवलेल्या ट्रॅक्टर मधून विठ्ठल रुख्मिणी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई,संत नामदेव यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.गावात छ्त्रपती शिवाजी महाराज चौक,विठ्ठल मंदिर,राम मंदिर,एस टी बस थांबा आदी भागातून लेझिम पथक व वाद्य वृंदाच्या नेतृत्वाखाली दिंडी व पालखी मिरवण्यात आली.गावात ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी व महिलांनी पालखीचे पूजन केले.ज्ञानदेव तुकाराम व टाळ मृदंगाच्या गजरात गावभर दिंडी चालली.विद्यालयाच्या प्रांगणात दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी झेंडे,तुलसी वृंदावन घेऊन गोल रिंगण केले.उपस्थित महिला व वारकऱ्यांनी यावेळी फुगड्याही खेळल्या.रिंगण सोहळा पाहून जणू आपण दिंडी सोहळ्यात सहभागी झालो असल्याची अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली या नंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून बनवलेल्या साबुदाणा खिचडीचे सर्वांना वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता झाली.

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव,ज्येष्ठ शिक्षक सोपान पवार,उपप्रमुख योगिता शिंदे,रुपाली महाले,कलाशिक्षक मिलिंद पाटील, क्रीडा शिक्षक दीपक पगारे,संवेदीता जाधव,भाऊसाहेब दहिफळे,नवनाथ माळी,सुहास जुन्नरे,शालेय राष्ट्रपती ज्योती पाटील,जनाबाई सुड के,भारती धाकतोडे,किरण पवार,सोनाली पाटील, रुपावली काळे,वर्षा मोरे,रोहिणी पवार,शबानाबी कादरी,राजेंद्र पालवे,संकेत शिंदे वैभव शिंदे भाऊसाहेब तांबे,निवृत्ती साबळे,राम शेळके,जालंदर कांडेकर,अनिकेत चतुर आदींनी परिश्रम घेतले.
