
गावदरा (. प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा येथे लहान चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठू माऊलीची पालखी काढत गावातून एक छान अशी विठू माऊलींची शाळाच भरवली. सर्व विद्यार्थीनी वारकरीच्या पोशाख परिधान करून जणू पंढरपूर चे वारकरीच निघाले विठ्ठलरुख्मिणीच्या दर्शनाला असाच देखावा तयार केला होता.श्री विलास सोनवणे हे शिक्षक नेहमी आपल्या कल्पनेने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. दरवर्षी आपले राष्ट्रीय सण उत्सव छान साजरे करत असतात तसेच शाळेत आनंददायी अध्यापन यामुळे त्यांनी शाळेचा पट दुप्पटीने ही वाढला. त्यांच्या ह्या कामासाठी श्रीम. हर्षदा शिवदे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मॅडम यांचे ही खूप सहकार्य लाभत असते. आजच्या दिंडीचा कार्यक्रम पाहुन गावातील सर्व ग्रामस्थांनी व शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थी व शिक्षकांचे मनभरून कौतुक केले.

