
एफडीएचे सह आयुक्त मिलिंद पाटील यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल नाशिक जिल्हा केमिस्ट संघटने तर्फे सत्कार करताना सचिव गणेश निकम,अध्यक्ष नितीन देवरगावकर आदी
नाशिक…( प्रतिनिधी )औषधे व सौंदर्य प्रसाधने 1940 च्या कायद्यात आता अपेक्षित बदल करणे गरजेचे असून ग्राहकाभिमुख कायदे होणे अपेक्षित आहे . असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त मिलींद पाटील यांनी केले .येथील केमिस्ट भवनात नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेने आयोजित केलेल्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात ते बोलत होते .यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष नितीन देवरगांवकर सचिव गणेश निकम , खजिनदार नितीन वालखडे , सेन्ट्रल झोनचे सचिव महेश भावसार , राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे , FDA चे सहाय्यक आयुक्त महेश देशपांडे , चंद्रकांत मोरे , सुरेश देशमुख आदि उपस्थित होते .यावेळी नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष नितीन देवरगांवकर यांनी FDA चे कर्तव्यदक्ष व सेवाभावी अधिकारी कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ फार्मा क्षेत्रात मिलींद पाटील यांनी घालून दिला .केमिस्ट व फार्मासिस्टसाठी औषधविक्री क्षेत्र समृद्ध करण्यासाठी व कायद्याच्या चौकटीत राहून मेडिकल व्यवसाय कसा करावा यासाठी पाटीलसाहेबांनी सतत मार्गदर्शन केले .अन्न व औषध प्रशासनातील 33 वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द अविस्मरणीय ठरली . मिलींद पाटील यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात देवरगांवकर बोलत होते .यावेळी नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे सन्मानपत्र , शाल , श्रीफळ देऊन पाटील यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे , माजी जिल्हाध्यक्ष सुदेश आहेर , गोरखशेठ चौधरी ,रत्नाकर वाणी ,अरूण काळे ,किरण छाजेड ,रविंद्र पवार , राज्य निमंत्रित सदस्य संदीप शेवाळे ,सेन्ट्रल झोनचे सचिव महेश भावसार तसेच नाशिक केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पुरकर तसेच शहर व जिल्हातील अनेक केमिस्ट उपस्थित होते .रामदास गव्हाणे यांनी सूत्रसंचालन तर गणेश निकम यांनी प्रास्ताविक केले .आभार सचिन वाळुंज यांनी मानले .
