
लांबबर्डी (प्रतिनिधी )आज दि.5जुलै 2025(शनिवार)रोजी जि.प.प्रा.शाळा लांबबर्डी येथे आषाढी एकादशी व दप्तरमुक्त आनंददायी शनिवार उपक्रमानिमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले.यावेळी बालगोपाळांनी वारकरी वेशभूषा करुन नटून थटून आले.विठूरायाच्या नामघोषात भजन करत सर्व बालवारकरी संपूर्ण वस्तीत नाचत फिरले.यावेळी महिलांनी विठ्ठल रूक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले.या बालदिंडीत टाटा पाॅवर कंपनीचे सन्माननीय श्री.विश्वास सोनावले,साकोरा ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच श्री.किरणभाऊ (बापूजी)बोरसे,ग्रा.पं.सदस्या सौ.यशोदाताई डोळे ,अंगणवाडी ताई श्रीमती रंजनाताई मोरे,सौ.योगिताताई बोरसे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्या सौ.मनिषाताई गावित,सौ.तुळसाताई घोगर,श्री.मोहन डोळे,श्री.सुकराम घोगर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षणार्थी श्रीमती मनीषा घाटाळे मॅडम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेत फणस व आंब्याच्या झाडांची रोपे लावली.
