
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) – मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव बालविकास मंदिर, कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चिमुकल्या बालगोपालांकडून विठू नामाचा गजर करत मौजे सुकेणे येथे आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल व विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कला मंच व संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी विठ्ठल रुक्माई ची आरती सादर केली गावातून भव्य दिंडी सोहळ्याचे यावेळी आयोजन करण्यात आले सुरुवातीला बँड पथक विठ्ठल रुक्माई ची पालखीतून मिरवणूक प्रति विठ्ठल व रुक्माई यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, प्रति तुकाराम महाराज, टाळ धरी विद्यार्थी, डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या विद्यार्थिनी, भगवा व पांढरा कुडता परिधान केलेले मुले व मुली, नऊवारी साडी परिधान केलेल्या विद्यार्थिनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या उपस्थितीत या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दिंडी प्रसंगी उपसभापती डी बी मोगल, प्राचार्य रायभान दवंगे, उपसरपंच सचिन मोगल, रामकृष्ण बोंबले,राजेश खताळ, प्रा राजेंद्र धनवटे,राहुल मोगल, सचिन भंडारे,रामेश्वर धोंगडे आदीँसह ग्रामस्थ सहभागी झाले दिंडी संपूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी सुहासिनींकडून ठिकठिकाणी दिंडीचे पूजन करण्यात आले दिंडीची सांगता विद्यालयातील प्रांगणात विद्यार्थ्यांचे गोल रिंगण करून करण्यात आली यावेळी विद्यार्थी व महिला शिक्षिकांनी फुगडी चा आनंद लुटला तर अभिनवच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळी गीते सादर केले यावेळी कसबे सुकेणे येथील शालेय विद्यार्थिनीचे अपहरण होण्या पासून बचाव करणारे ग्रामस्थ लखन गांगुर्डे यांचा उपसभापती मोगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती मोगल व प्राचार्य दवंगे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सुंदर फलक लेखन व आकर्षक चित्र कला शिक्षिका श्रीमती आरती मोरे व श्रीमती गायकवाड यांनी काढले सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार राजेंद्र धनवटे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व सेवक उपस्थित होते
