
नांदगाव- (प्रतिनिधी ) नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत येऊन विठ्ठल नामाचा गजर करत अवघा शालेय परिसर भक्तिरसात चिंब भिजून गेला. ही संतांची भूमी आहे.संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, संत तुकाराम, यांचे अभंग म्हणत विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ विशाल सावंत,प्रिन्सिपल मनी चावला यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विठ्ठल नामाचा जयघोष करत बाल वारकऱ्यांची ही दिंडी सावता मंदिरात पोहचली.या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामध्ये,अभंग गायन, समूह नृत्य,गोल रिंगण,फुगडी, वारकरी पाऊली इ. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.यानंतर बाल वारकऱ्यांची ही दिंडी शहरातील मुख्य चौकातून शाळेत आली. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन चेअरमन मा.श्री.सुनिलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल,दिलीप पारख,प्रिन्सिपल मनी चावलामुख्याध्यापक गोरख डफाळ तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विशाल सावंतशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
