
मनमाड :-(प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल येथे आषाढी एकादशी दिंडी उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. धात्रक मॅडम होत्या.कार्यक्रमाप्रसंगी अभिनव चे मुख्याध्यापक श्री. वाघ सर प्रमुख पाहुणे होते. मराठा विद्या प्रसारक समाज नांदगाव तालुका संचालक श्री. अमितभाऊ बोरसे पाटील यांनी सर्वानाच आषाढी एकादशी च्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ पालखी पूजनाने करण्यात आली..तसेच अनेक विद्यार्थी वारकरी, विठ्ठल -रुख्मिणी, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई इ. वेशभूषा करून आलेत .आजचा हा कार्यक्रम सकाळ सत्र व दुपार सत्र या दोन्ही सत्रात घेण्यात आला.श्रीमती. आम्रपाली मोरे मॅडम यांनी विदयार्थ्यांना माहिती दिली.अनेक विदयार्थ्यांनी अभंग -कीर्तन -भारूड सादर केले.शेजारील अनकवाडे गावात चिमुरडे वारकरी दिंडी मध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती एकता बोधडे यांनी केले. कार्यक्रम साठी सर्व शिक्षिका, शिक्षककेतर कर्मचारी उपस्थित होते.
