
नाशिक (प्रतिनिधी )आजचा दिवस स्वामी विवेकानंद सोसायटी संचालित,श्रीमान टी जे चौहान विद्यालय मोरवाडी या शाळेसाठी अत्यंत खास ठरला आहे. शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने पवित्र दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात पार पडला.या मध्ये इयत्ता ५ वी आणि ६ वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.यात विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी ,वेगवेगळ्या सतांची ,वारकरी यांच्या वेशभूषा करून आलेले होते. लहानग्या विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे हातात घेऊन, डोक्यावर फेटे बांधून आणि पायात गजरे बांधून ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या गजरात शाळा परिसरात आणि गावात सुंदर दिंडी काढली.एक सारख्या तालावर टाळ, मृदुंग आणि झांज यांचा गजर वातावरण भक्तिमय करत होता. मुलांच्या आवाजाने आसमंत निनादला —“पांडुरंग हरि! विठ्ठल हरि!”या दिंडीमधून एकतेचा संदेश, भक्तीची ज्योत आणि परंपरेचा सन्मान पुढे नेण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे.तसेच या प्रसंगी विठ्ठल रुक्मिणी च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.वृक्ष दिंडी देखील काढन्यात आली.यात सिड बॉल चे वाटप करून परिसरातील लोकांना एक चांगला संदेश यातून दिला.मुख्याध्यापिका, व श्रीयुत शिवाजी मोरे सर यांनी मुलांना विठ्ठलनामाचे महत्त्व समजावले आणि सर्व शिक्षकांनी या दिंडीचे सुंदर आयोजन केले. पालकवर्ग आणि गावकरीही या सोहळ्याला साक्षीदार झाले आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा.मुख्याध्यापिका उज्वला माळी,पर्यवेक्षक श्री कीर्तिकुमार गहाणकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली 💐 या सुंदर सोहळ्याच्या निमित्ताने एवढंच म्हणावसं वाटतं —“संस्कारांची गोडी, भक्तीची ओढ, शिक्षणाची वाट – याचं संगमच हे शाळेचं दिंडी सोहळा!”🙏🏻 विठ्ठल विठ्ठल! जय हरि विठ्ठल!
