
मोरेवाडी ( प्रतिनिधी ) आषाढी एकादशी निमित्ताने आज जि.प.प्रा.शाळा मोरेवाडी येथे शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत गावातून वारकरी दिंडी काढण्यात आली.सदर दिंडीत शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी पेहराव केलेला होता.तसेच मुलींनी साड्या, लुगडे नेसून हातात विठ्ठल रखुमाईची मूर्ती व तुळस घेऊन गावात समतेचा प्रसार केला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भिमबाई मोरे,पालक बारकु मोरे,रोहिदास पवार,दिपाली पवार,छबाबाई मोरे,रोहिणी मोरे, मुख्याध्यापक बागुल सर,सहशिक्षिक योगिता कापुरे,अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता राठोड,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शितल मोरे,व विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले

