
नाशिक (प्रतिनिधी) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज शनिवार दि.०५/०७/२०२५ रोजी आषाढी एकादशी निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची आषाढी वारी पंढरपूरची उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम व उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर यांच्या हस्ते पूजन करून विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

पालखीतील ज्ञानेश्वरीचीे पूजन करण्यात आले.विठ्ठलाच्या भूमिकेत कु.अदविका शिरसाठ ६-अ व कु.सोनाली वरकड ६-ब तर रुक्मिणीच्या भूमिकेत कु.स्वरा चव्हाण ६-अ व कु.यशस्वी सातपुते ६-ब यांनी वेशभूषा परिधान केली होती.या प्रसंगी विठ्ठलाची आरती करण्यात आली. विद्यार्थिनीनी विठ्ठल-रुक्मिणी यांचे भक्तिगीते,भजन, आषाढीची माहिती,अभंग सादर केले.यात झुक झुक आगीनगाडी,निघाली बाई मी पंढरपूरला.. ५-अ,पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान.. -५ब,पांडूरंगा पांडूरंगा दर्शन द्या हो मला,शरणी आलो तुला.. ५-क,विठाई माझी विठाई दुमदुमली पंढरी.. ६-अ,रखुमाई रखुमाई.. ६-ब,देवा तुझ्या नावाचं येड लागलं.. ७-अ,पंढरपुरात काय वाजतं गाजतं..७-ब,माऊली माऊली रुप तुझे… ८-अ,अशी पंढरी पंढरी गं,विठूरायाची नगरी.. ८-ब,चल गं सखे,चल गं सखे पंढरीला.. ८-क अशी सुंदर भजने विद्यार्थिनींना सुंदरतेने सादर केली.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करुन वारी म्हणजे शिस्त,सेवा आणि सहिष्णुतेचा प्रवाह आहे असे मनोगत व्यक्त केले.

.उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी सर यांनी सर्वाचे आभार मानतांना पंढरपूरचा विठोबा-रुक्मिणी हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा मोठा मेळा पंढरपूरला भरतो.या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे,असे सांगितले. टाळ-मृदुंगाच्या गजरात ,झिम्मा-फुगड्या खेळत विद्यार्थिनीनी खांद्यावर पालखी व डोईवर तुळशी वृंदावन घेऊन पालखित ज्ञानेश्वरी ठेवून व पर्यावरणाचा संदेश दिला *काळयाभोर ढगांची दाटी,टाळ मृदंगाची जुगलबंदी,माऊली नामाचा गगनभेदी..* अशा हरिनामाच्या जल्लोषात संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत संपूर्ण वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.शालेय परिसरातून पालखी घेऊन दिंडी काढण्यात आली.विद्यार्थिनींनी टाळ नृत्य सादर केले.आणि त्यात सर्व शिक्षक सहभागी झाले होते.शालेय पदाधिकारी व शिक्षिकेनेही लेझीम,झिम्मा फुगडी खेळतांनाची एक वेगळीच अनुभूती – *पंढरीच्या लोकां,नाही अभिमान,पाया पडे जन,एकमेकां..!* असंच काहीसं आज पाहावयास मिळाले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे व उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.प्रतिभा महाजन ,सौ.चेतना टोपले ,सौ.दिपाली ठाकूर , श्रीमती अर्चना गायकवाड,,सौ.लता शिंदे , श्री.गणपत मुकणे, श्री.भिकन मोरे , श्री.विजय ,सरोदे सौ.सिमा कोळी,सौ.रंजना खैरनार यांचेसह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन कु.मानवी सुर्यवंशी ८-अ हिने केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.रमेश महाशब्दे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक मा.राजेंद्र सोमवंशी व ज्युनिअर काँलेजचे उपमुख्याध्यापक मा. मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री. कैलास बागुल ,सौ.भारती चंद्रात्रे ,सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिंनीनी उपस्थित होते.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
