
नाशिकरोड:-(प्रतिनिधी ) भाविक आणि वारकऱ्यांचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भजन-कीर्तनांच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त नासाका विद्यालयात विठूनामाचा गजर करण्यात आला. पळसे येथील नासाका माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची विद्यालय ते नाशिक सहकारी साखर कारखाना अशी वारकरी दिंडी काढण्यात आली.

दिंडीत नऊवारी साडी आणि वारकरी सांप्रदायिक वेशभूषा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. नासाका आवारात दिंडीचे आगमन झाल्यानंतर अधिकारी-कर्मचारी यांनी पालखीची विधिवत पूजा करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. चॉकलेट वाटप करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी दिंडीचे उत्तम संयोजन केले.फोटोओळी:- आषाढी एकादशीनिमित्त आयोजित नासाका माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीप्रसंगी मान्यवरांसह शिक्षक-कर्मचारीवृंद.
