
जळगाव बु (प्रतिनिधी )जि प शाळा जळगाव बुद्रुक येथे गुंजला विठू नामाचा गजर*विध्यार्थ्यांना शिक्षणासोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतीची तसेच संत परंपरेची ओळख व्हावी म्हणून जळगाव बुद्रुक येथील जि प प्राथमिक शाळेत प्रतिकात्मक दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती.

मुलींनी कलश, तुळशी वृंदावन हाती घेऊन वारीत विठूनामाचा गजर केला. चैतन्य बुरकुल व इतर मित्रांनी टाळ मृडुंगाच्या साथीत भजन हरिपाठ म्हणत भक्तीचा जागर केला. विठूनामाच्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला. गावात दिंडीचे स्वागत घरोघरी औक्षण करून करण्यात आले. सरपंच श्री विश्वनाथ कांदे यांनी वारीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. प्रकाश मोरे सर यांनी मार्गदर्शन केले.सदर वारीचे नियोजन श्री शैलेश टिळेकर यांनी केले,

श्री प्रविण ठाकरे यांनी संयोजन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी शा.व्य.स.अध्यक्ष श्री. नवनाथ सांगळे पालक , शाळेचे शिक्षकवृंद सौ. शारदा महाले, श्रीम संगीता सोनवणे, श्रीम. छाया बोरसे, श्रीम. कविता रोकडे, श्री. वाल्मिक शेवरे , श्री अमोल बच्छाव, श्री. अजिंक्य गायकवाड, श्री. गोरे, श्री येवले, श्रीम नागरे, श्रीम केदारे आदींचे सहकार्य लाभले.
