
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९५७ वा दिवस
'उद्धरेदात्मनात्मानम्' प्रत्येकाने आपापला उद्धार करून घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे, म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे. हाच खरा पुरुषार्थ होय. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वाधीनता प्राप्त करून घेण्याच्या दिशेने स्वतः प्रगती करणे आणि इतरांनाही तशी प्रगती करून घेण्यास साहाय्य करणे हाच परम पुरुषार्थ होय. स्वाधीनतेच्या विकासाच्या मार्गात अडथळा आणणारे सर्व सामाजिक नियम घातक असून त्यांचे शक्य तो लवकर उच्चाटन करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १४ आषाढ शके १९४७
★ आषाढ शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ५ जुलै २०२५
★ १९४३ थोर स्वातंत्र्यसेनानी रास बिहारी बोस यांनी “आझाद हिंद सेनेची” स्थापना केली.
★ १९९६ रहस्यकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा स्मृतीदिन.
