
नांदगाव (प्रतिनिधी ) शुक्रवार दि. 04/07/2025 रोजी *श्री. वाल्मिक सर्जेराव बोरसे रा. साकोरा ता. नांदगाव जि. नाशिक* यांनी आपला कांदा शेतमाल नांदगाव बाजार समितीत विक्रीस आणला होता. सदर शेतमाल मे. संदीप हस्तीमल यांनी खरेदी केला. सदर शेतमालाचे एकूण पेमेंट रक्कम रुपये 11909 इतके झाले असताना त्यांना संबंधित खरेदीदाराकडून चुकून रक्कम रुपये 19909 इतके पेमेंट अदा झाले. म्हणजेच एकूण हिशोबाच्या रक्कम रुपये 8000 इतके त्यांना जास्त मिळाली होती. सदर बाब संबंधित शेतकरी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा दाखवत जादा आलेली रक्कम रुपये 8000 बाजार समिती कार्यालयात आणून दिले. यामुळे संबंधित शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा दिसून आला, सर्वत्र त्या शेतकऱ्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले. बाजार समिती प्रशासनाकडून देखील त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
