
सटाणा ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय मुळाणे येथे एक पेड माँ के नाम उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.पगारे व विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक यतिन शेवाळे व पालक उपस्थित होते.प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.पगारे यांनी झाडांचे महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे याची माहिती सांगून झाडे लावण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. गोकूळ वाघ यांनी देखील पर्यावरण संरक्षण विषयी माहिती सांगून झाडे जगवण्याचे आवाहन केले.क्रिडा शिक्षक श्री.आबा अहिरे यांनी विविध सुचना देत आपल्या आई सोबत किंवा वडीलासोबत फोटो काढून तो फोटो शाळेला पाठवून संग्रहित करून ठेवा असे सांगितले तसेच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला झाडाचं एक रोप शाळेकडून वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षिका श्रीम.एस.एल.बच्छाव यांनी सुंदर फलकलेखन केले.सूत्रसंचालन श्री.आबा अहिरे यांनी व आभार श्रीम.डि.बी सावकार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
