
.ओझर: ( वार्ताहर) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात आषाढ पाऊसवारी निमित्त संगीत शिक्षिका शितल आहेर व विद्यार्थ्यांनी भजन गवळणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्व शिक्षक विद्यार्थी या कार्यक्रमात तल्लीन झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे होते. यावेळी त्यांचा सत्कार संगीत शिक्षिका शितल आहेर यांच्या हस्ते झाला. व्यासपीठावर मुख्याध्यापक सोपान वाटपाडे पर्यवेक्षक दशरथ शिंदे राजेंद्र शिंदे प्रभाकर लवांड आत्माराम शिंदे रेखा देशमाने वर्षा पाटील आधी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका शीतल हांडोरे यांनी केले.

