
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे. चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त स्वामीजींचे अजरामर विचार चिरकाल स्मरणात राहावेत या उद्देशाने स्वामीजींच्या प्रेरक विचारांची पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली. एच.पी.टी.महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका डॉ.सौ.साधनाताई गोखले यांनी वरील स्पर्धेचे परीक्षण केले.यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषेतून विद्यार्थ्यांनी सुविचार सादर केली.त्यामध्ये पुढील इयत्ता प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.१) पाचवी ब २) सहावी क ३) सातवी ड ४) आठवी क ५) नववी ब ६) दहावी अ या वर्गाचा फिरत्या ढाली देऊन गौरव करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. जयश्री जाधव यांनी आपल्या मनोगतातून स्वामीजींच्या जीवनपट मांडला. पाहुण्यांचा परिचय विनायक नवसुपे यांनी करून दिला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख शिवाजी मोरे यांनी केले.. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदानी परिश्रम घेतले.
