
.

कु.श्रावणी संतोष सांबरेकर
नाशिक (प्रतिनिधी)..आपल्या नाशिककरांसाठी खूप आनंदाची बातमी आहेकी, नाशिकची सुपुत्र कुमारी श्रावणी संतोष सांबरेकर ही नेटबॉल खेळातील सुरुवातीपासून अष्टपैलू खेळाडू आहे, तीने वेगवेगळे ठिकाणी राज्यस्तर स्पर्धेत व राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकची मान उंचावलेली आहे, या खेळाडूचे शालेय जीवनापासूनच श्री स्वप्निल करपे यांनी नेटबॉल खेळासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले व आजही योगायोगाने तिच्या क का वाघ महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून प्रा स्वप्निल करपे सर कार्यरत आहे मार्गदर्शन करीत आहे, श्रावणीचे ओळख संपूर्ण भारतात बऱ्याच दिवसापासून नेटबॉल खेळाच्या अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे.नासिक जिल्ह्यातून नेटबॉल या खेळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली पहिली खेळाडूआहे, श्रावणी सांबरेकर हीची निवड वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा तसेच यावर्षी जयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी शिबिर यातून तिची निवड भारतीय संघात करण्यात आलेली आहे , प्रथमता हरियाणा व त्यानंतर हैदराबाद येथे झालेल्या निवड चाचणी शिबिरामधून आंतरराष्ट्रीय एशियन युथ नेटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. आम्हाला खात्री होती की भारतीय संघात श्रावणी सांबरेकर हीची निवड नक्की होणार आहे. आता सध्या भारतीय संघ साउथ कोरिया येथील देशातील जॉन्जू या शहरात उपस्थित आहे, दिनांक 27 जून ते 4 जुलै दरम्यान आंतरराष्ट्रीय एशियन युथ चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा संपन्न होणार आहे. श्रावणी सांबरेकर च्या यशाबद्दल नाशिक जिल्हा नेटबॉल अध्यक्ष श्री संजय पाटील, सचिव श्री स्वप्निल करपे तसेच श्रावणीच्या शालेय जीवनातील क्रीडा शिक्षिका सुरेखा पाटील, के के वाघ एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव बंदी सर, स्मॉइल व स्पिन्याच संस्थेचे अजिंक्य वाघ, सरस्वती नगर कॅम्पसचे समन्वयक डॉक्टर शेवलीकर, प्राचार्य डॉ संभाजी पाटील, उपप्राचार्य डॉ अनुराधा नांदुरकर विज्ञान शाखाप्रमुख प्रा.अर्चना कोते व इतर सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे, राष्ट्रीय खेळाडू व पंच अभिजीत देशमुख पवन खोडे युवराज शेलार अनिकेत देशमुख रोहित भामरे भावेश नांद्रे व नाशिक जिल्हा नेटबॉल संघटना प्रेमी व इतर हितचिंतकांनी श्रावणी ला शुभेच्छा दिल्या
