
येवला ( प्रतिनिधी, ). नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणी निवडी बाबतची बैठक संघाचे मार्गदर्शक सुरेश शेलार व सचिव एस.बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती वीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून शिवरे येथील विद्यालयाचे प्राचार्य प्रदिप सांगळे यांची बिनविरोध अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी साकोरे येथील पेडकाई माता विद्यालय ता.नांदगावचे उपक्रम शील मुख्याध्यापक योगेश पितांबर पाटील यांची बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी एस.बी.देशमुख, सुरेश शेलार,महोन चकोर यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातुन मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे उपस्थितांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
