
आणीबाणी कारावास भोगलेल्या नांदगांव तालुक्यातील दत्तात्रय गुप्ता यांचा संभाजीनगर जिल्हाधिकारीच्या हस्ते सत्कार
संभाजीनगर (प्रतिनिधी). लढा सुरू असल्याने इंदिरा गांधी यांनी २१ मार्च १९७७ ला आणिबाणी मागे घेण्याची घोषना करून सर्व लोकतंत्र सेनानी ना सोडून दिले. भारत भर जल्लोश सुरु झाला. झालेल्या घटनेस आज 50 वर्षे पूर्ण झाली. या निमित्य आणीबाणी कारावास भोगलेल्या व्यक्तीना अपरजिल्हाधिकारी श्री.अडकूने यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी सभागृहात सकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. संभाजी अडकूने(अपरजिल्हाधिकारी), संगीता राठोड(उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन), सुचिता शिंदे(उपजिल्हाधिकारी भूसंपादन), एकनाथ बंगाले(उपजिल्हाधिकारी जायकवाडी प्रकल्प), लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री राजेन्द्र मधुकरजी गुप्ता होते. सन्मानपत्र वितरनाचा सोहळा भव्य दिव्य संपन्न झाला. आणीबाणी त कारावास भोगलेल्या व्यक्ती आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
