
नाशिक. (प्रतिनिधी ) नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी निवडीसंबंधी बैठक आज शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 रोजी मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक सुरेश शेलार सर व सचिव श्री एस बी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभागृहात पार पडली. मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री एस बी देशमुख यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर तसेच कार्यकारणी बदल करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शिवरे विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रदीप सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री कोंडाजी मामा आव्हाड उपाध्यक्ष उदय भाऊ घुगे सरचिटणीस हेमंत आप्पा धात्रक सहचिटणीस दिगंबर नाना गीते स्थानिक संचालक श्री बबनराव सानप सर्व विश्वस्त संचालक सेवक संचालक शिक्षणाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
