
सिन्नर ( प्रतिनिधी)सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर संचलित, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर,सिन्नर दिनांक ४/७/२०२५ शुक्रवार रोजी कै. भगवान सदाशिव भाटजिरे यांचे स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी पत्नी श्रीमती .सुनिताताई भाटजिरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वजनकाटा भेट दिला. या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.मंगलाताई झगडे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आवर्जून उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता राजगुरू यांनी दिलेली भेट स्वीकारत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत दर तीन महिन्यांनी मुलांचे वजन मोजावयाचे असते त्यासाठी आम्ही दिलेल्या भेटीचा जरुर उपयोग करु असे आश्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्रीम. रोहिणी मिठे यांनी मानले. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर इ.१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
